“गॅंग ऑफ ट्रेकर्स’तर्फे 3 दिवसांत पाच गड सर
पुणे : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गॅंग ऑफ ट्रेकर्स, पुणेतर्फे 3 दिवसांत 5 गड सर करण्याची मोहीम आखली होती. यामध्ये ॲड. सम्राट रावते, विश्राम कुलकर्णी, मृदुला परळकर, अद्वैत तुपे, प्रणव नेसवणकर आणि श्रीराम काटकर या ट्रेकर्संनी सहभाग घेतला. सातारा जिल्ह्यातील कमळगड, वसंतगड, चंदन, वंदन आणि अजिंक्यतारा हे किल्ले या मोहिमेत सर करण्यात आले.
करोना आणि बदलत्या शैलीमुळे होणाऱ्या आरोग्य हणीच्या पार्श्वभूमीवर शारीरिक तंदरुस्तीचा संदेश या मोहिमेत देण्यात आला. यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये नाशिक जिल्ह्यात 6 दिवसांत 6 किल्ले, 2020 मध्ये रायगड जिल्ह्यात 3 दिवसांत पाच किल्ले सामाजिक संदेश देत या ग्रुपतर्फे सर केले. विशेषत: या सर्व मोहिमांमध्ये 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनी सहभाग घेतला.
त्यांच्या पालकांची मुलांच्या आरोग्याप्रती असलेली जागृकता कौतुकास्पद आहे. यापुढेदेखील अश्याच प्रकारच्या मोहिमा पार पाडण्याचा मानस असल्याचे ग्रुपचे संस्थापक ॲड. सम्राट रावते यांनी सांगितले.