जन्म-मृत्यूची नोंद प्रत्येक ग्रामपंचायतींनी करणे बंधनकारक
पुणे जिल्ह्यातील एक हजार 817 महसूली गावांपैकी केवळ 246 गावांत ऑनलाईन नोंदणी
पुणे : ग्रामपंचायतीमध्ये जन्म व मृत्यूची नोंद घेणे बंधनकारक असून, त्याबाबतची माहिती सीआरएस या पोर्टलवर नोंदविणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील एक हजार 817 महसूली गावांपैकी केवळ 246 गावांत ऑनलाईन नोंदणी केली जात आहे, अशी माहिती जन्म-मृत्यू समितीच्या बैठकीत समोर आली आहे. त्यामुळे या गावांनीही जन्म-मृत्युची नोंदणी सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख जिल्हास्तरीय जन्म-मृत्यू समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते. गावातील व्यक्तींना जन्म-मृत्युची नोंद करण्यासाठी पायपीट करावी लागते. नोंदणीबाबत ग्रामपंचायतीमध्ये विचारणा केली तर या ठिकाणी होत नाही, नोंदणी कार्यालयात जावे लागेल. मात्र, मुळात ग्रामसेवकांना ही नोंदणी करण्याचे अधिकार असून, त्यांची ती जबाबदारी आहे. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये ही नोंद करून घेतली जात नाही.
ग्रामपंचायत स्तरावर जन्म-मृत्यूची नोंद आवश्यक असून, त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सीआरएस या पोर्टल उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यात एकूण 1 हजार 871 गावे असून, यातील 246 गावांतील माहिती अपडेस करत आहेत. तर उर्वरित ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक माहिती भरण्यास टाळाटाळ करत असून, त्यांना माहिती अपेडट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केली आहे.
1 Comment
[…] जन्म-मृत्यूची नोंद प्रत्येक ग्रामपंच… […]