साताऱ्यातील ‘पाऊससभा’ आता एका क्लिकवर
बारामतीच्या सतीश पवार यांच्या संकल्पनेतून पहिलाच प्रयोग
बारामती – बारामती येथील ‘स्टर्लिंग सिस्टिम्स’च्या सतीश पवार यांनी झर्रींरीरींश्रर डरहूरवीळ नावाचं एक मोबाइल ऍप्लिकेशन तयार केले आहे. यातून मोबाइलचा कॅमेरा शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेतल्या फोटो समोर नेताच, सभेचा तोच थरार पुन्हा अनुभवू शकणार आहे. “ती’ ऐतिहासिक सभा केवळ एका क्लिकवर आली आहे.
हे ऍप्लिकेशन ऑगमेंटेड रिऍलिटी म्हणजेच “आभासी वास्तव’ अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून इतिहास व तंत्रज्ञानाचा संगम सतीश पवार यांनी साधला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उलथापालथ करणारी अशीच एक ऐतिहासिक घटना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 18 ऑक्टोबर 2019 रोजी भरपावसात झालेली साताऱ्यातील सभा ठरली.
काही मिनिटांच्या भाषणाने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलली. समाजमाध्यमांतून तो क्षण महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. सभेबद्दल वृत्तपत्रांत लेख, पुस्तकं, कविता रचल्या. राजकीय विश्लेषणे झाली. ही सभा पवार यांच्या अर्धशतकी राजकीय कारकिर्दीतील सुवर्ण अध्याय ठरला. आजही अनेकांना तो फोटो संकटसमयी लढण्याची प्रेरणा देणारा ठरला आहे.
हीच भावना ओळखून ती सभा पुन्हा जिवंत करण्याची किमया सतीश पवार यांनी साधली. सतीश पवार यांनी झर्रींरीरींश्रर डरहूरवीळ नावाचं एक मोबाइल ऍप्लिकेशन तयार केले आहे. ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या मोबाइलचा कॅमेरा पवारांच्या त्या साताऱ्यातील सभेतल्या फोटो समोर नेताच, सभेचा तोच थरार आपण पुन्हा अनुभवू शकतो. ऍप्लिकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारी “ती’ ऐतिहासिक सभा आता केवळ एका क्लिकच्या अंतरावर आली आहे.
मुंबई येथे स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीत ऍपचे अनावरण केले. यावेळी ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, खासदार सुप्रिया सुळे, हेमंत टकले, एमकेसीएलचे चीफ मेंटॉर विवेक सावंत उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक पटलावर दीर्घकालीन परिणाम करणारी ‘ती’ सभा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण दस्तावेज ठरला आहे. डिजिटल युगात त्याचे जतन व्हावे, या उद्देशाने ऍप्लिकेशनची निर्मिती केली आहे. सभेतील फोटो सर्वांना लढण्याची ऊर्जा देतो. हा प्रेरणादायी फोटो समोर दिसताच ऍप्लिकेशनच्या माध्यमातून संपूर्ण भाषण सर्वांना कायमस्वरूपी अनुभवता येणार आहे, याचं समाधान वाटतं.
– सतीश पवार, बारामती.