sahyadrilive
administrator
तब्बल ५० दिवसांनंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरातून बाहेर
मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांचा बिगबॉस मराठी ३ च्या घरातील ५० दिवसांचा प्रवास संपला आहे. एक उत्तम स्पर्धक म्हणून त्यांचा घरात वावर होता. मात्र घराबाहेर पडल्यानंतर बिगबॉसच्या मंचावरून तृप्ती देसाई यांनी दोन घोषणा केल्या. आता या क्षणापासून बलात्कारमुक्त महाराष्ट्र आणि राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तृप्ती देसाई कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करतात की स्वत:चा नवीन राजकीय पक्षाची बांधणी करणार हा विषय चर्चेचा ठरला आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो म्हणून सध्या बिगबॉस मराठी आहे. गेल्या ५० दिवसांपासून घराघरात या कार्यक्रमाचे चाहते तयार झाले आहेत. यापूर्वी हभप शिवलिला पाटील (आजारपणाचे कारण), अक्षय वाघमारे, अभिनेत्री सुरेखा कुडची, आदिश वैद्य, मालिका विश्वातील अभिनेता अविष्कार दारव्हेकर हे स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. याशिवाय आतापर्यंत दोन वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. यामध्ये आदिश वैद्य आणि निथा शेट्टी-साळवी यामध्ये आदिश हा केवळ दोनच आठवडे घरात राहिला.
तृप्ती देसाई यांनी घराबाहेर पडल्यानंतर बिगबॉसच्या मंचावर मोठी घोषणा केली. त्या म्हणाल्या की, खरं तर ५० दिवस म्हणजे मोठा प्रवास आहे. कारण बाहेर मी जेव्हा काम करत असते. एखादा दिवस कुठं जायचं. मोबाईल बंद ठेवायचा किंवा मोबाईल बंद असेल तर कसंतरी होतेय. पण बिगबॉसचं घर जे आहे ते खूप वेगळे आहे. या घराने मला इतकं प्रेम दिले म्हणजे घरातील सदस्यांनी. मी गेली १५ वर्षे जे विसरले. कॉलेजचे जीवन आणि मी घरात कशी वागते याबाबत जनतेला काहीच माहिती नाही. बाहेर बऱ्याचदा आंदोलनात किंवा अन्य ठिकाणी मला आक्रमकपणे भांडताना पाहिले गेलं. मी घरी जशी आहे, तशी मी अनेकांना सांगायची, मी अशी नाही तरीही अनेक लोक मला घाबरायचे. बिगबॉसच्या घरामधील प्रवासानंतर मी आणखी एक चांगली बाजू समाजाला कळली, त्याबद्दल मी बिगबॉसची ऋणी राहिल. या घरातील सगळ्यांशी मैत्री कायम राहिल. मात्र दादूस (संतोष चौधरी) यांच्याशी माझी मैत्री वेगळी राहिली. त्यांच्यासोबतच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
बिगबॉसच्या घराबद्दल बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, मी जेव्हा बोहर असताना बिग बॉसमध्ये बोलविले. मी इथं येणार असल्याने अनेक गैरसमज बोलले जात होते. हे शो स्क्रीप्टेड आहे. तुम्ही सोशल वर्कर आहात. इथे गेल्यावर तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. किंवा तुम्ही तिथे जाऊ नका, असे अनेकांनी मला सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात असं काही नाही. बिगबॉसचे घर हे खूप छान आहे. या घरात स्पर्धक म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी खेळात सहभागी आहेत.
मी जिंकून येईल, असे मी म्हटले होते. मात्र गेल्या ५० दिवसांत मी सर्वांची मनं जिंकून आली आहे. माझ्यासाठी ही वेगळी ‘जर्नी’ होती. याआधी मी सांगायची की सामाजिक कार्यात मी काम करतेच. पण मला खरंच सामाजिक कार्याची आवड आहेच, पण मी लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणाही सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बिगबॉसच्या मंचावरून केली. त्यामुळे तृप्ती देसाई या आता कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार की स्वत:चा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, दिवाळीनिमित्त ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील अंतरा आणि मल्हार यांनी दिवाळीची धम्माल उडवून दिली. आवडत्या स्पर्धकांची कौतुक केले. याशिवाय गायत्री दातार आणि जय दुधाणे यांचे बाजीराव-मस्ताणी या हिंदी चित्रपटातील काशीबाई-बाजीराव यांच्यातील प्रसिद्ध डायलॉगने चाहत्यांसह घरातील सदस्यांनी चांगलीच वाहवा मिळवून दिली.
administrator
जगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत? सबस्क्राइब करा
आपण वृत्तपत्राची यशस्वीरित्या सदस्यता घेतली आहे
आपली विनंती पाठवण्याचा प्रयत्न करताना एक त्रुटी आली. कृपया पुन्हा प्रयत्न करा.