नव्या स्मार्ट LPG सिलेंडरमध्ये पाहता येणार गॅसची लेवल, एक्सचेंज ही करता येणार Copy
मुंबई : Indane Smart Cylinder: इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC) ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन सिलेंडर आणलं आहे. IOC च्या मते, हा सिलेंडर स्मार्ट किचनच्या संकल्पनेतून बनवण्यात आला आहे. या सिलेंडर ला Composite Cylinder असं नाव देण्यात आलं आहे. या सिलेंडरचे वैशिष्ट्ये म्हणजे, यामध्ये गॅस किती वाचला आहे हे पाहता येणार आहे.
Indane चा Smart सिलेंडर
इंडेन कंपोजिट सिलेंडर साधारण सिलेंडरहून अधिक मजबूत आणि सुरक्षित आहे. याचं कारण म्हणजे ते तीन लेअर पासून तयार करण्यात आलं आहे. हा एक ब्लो-मोल्ड हाय-डेंसिटी पॉलिइथाइलीन (HDPE) इनर लाइनर पासून बनला आहे. जो पॉलीमरने कव्हर फायबर ग्लासच्या एका लेअरने बनला आहे. बाहेर तो HDPE जॅकेटमध्ये फिट केला आहे.
सध्या जे सिलेंडर आहेत ते स्टीलपासून बनलेले असतात.
Composite Cylinder चे फायदे
1. हा सामान्य सिलेंडरच्या तुलनेत वजनाने कमी आहे.
2. सिलेंडरचा काही भाग पारदर्शी असल्याने त्यामध्ये किती गॅस वाचला आहे. हे पाहता येणार आहे.
3. महत्त्वाचं म्हणजे तो गंजत नाही. लादीवर यामुळे डाग ही पडणार आहे.
4. मॉडर्न किचेनच्या संकल्पनेतून तो बनवण्यात आला आहे.
5. सध्या कंपोजिट सिलेंडर दिल्ली, गुरुग्राम, हैदराबाद, फरीदाबाद आणि लुधियानाच्या काही डिस्ट्रीब्यूटर्सकडे आहे. जो 5 किलो आणि 10 किलोच्या क्षमेतेसह येतो. लवकरच संपूर्ण देशात तो मिळणार आहे.
6. 10 किलो सिलेंडर फक्त घरगुती विनाअनुदानितसाठी आहे. तर 5 किलोचा सिलेंडर सबसिडीच्या ग्राहकांसाठी आहे.
एक्सचेंज करता येणार
जर तुम्हाला हा सिलेंडर हवा असेल तर तुम्हाला यासाठी सिक्योरिटी डिपॉजिट द्यावं लागेल. 10 किलोच्या सिलेंडरसाठी 3350 रुपये तर 5 किलोच्या सिलेंडरसाठी 2150 रुपये मोजावे लागतील. जर तुम्ही Indane चे ग्राहक आहात तर सध्याच्या सिलेंडरने तुम्ही कंपोजिट सिलेंडरला एक्सचेंज करु शकता. सामान्य सिलेंडर्सप्रमाणे कंपोजिट सिलेंडरची देखील होम डिलिव्हरी होते. इंडेनचा डिस्ट्रीब्यूटर हा सिलेंडर तुमच्या दारापर्यंत पोहोचवणार आहे.