मुख्यमंत्र्यांना 1000 पत्रे पाठवून स्मरण; भाजप नेते संदीप सातव यांची माहिती
भाजप नेते संदीप सातव यांची माहिती
श्रीमान उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची आठवण करून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रमजी पाटील यांच्या सूचनेनुसार व पुणे जिल्हा अध्यक्ष किरण दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव भीमा येथे युवा मोर्चाच्या वतीने 1000 पत्र मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर ती टपालाने पाठवण्यात आले असल्याची माहिती आणि संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी दिली.
यावेळी सातव यांनी सांगितले की आमचा देश हा आमच्या अस्मितेचा विषय आहे आणि देशाच्या स्वातंत्र्याचे कितवे वर्ष हे माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला माहिती नसणे हे राज्याचे दुर्दैव आहे देशाचा अभिमान असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला हिरक महोत्सव म्हणून संबोधने आपल्या सारख्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला शोभते का..?
राज्यात युवांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काही काम कराल यावरून आता सर्वांचाच विश्वास उडाला आहे, मात्र किमान देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तरी आपण लक्षात ठेवावा एवढीच आपल्या कडून माफक अपेक्षा आहे असे संदीप सातव यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदिप सातव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे, कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जयेश शिंदे , विद्यार्थी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अमोल शिवले,
पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश सातव, शरद आव्हाळे ,उमेश मोरे , संपर्कप्रमुख नितीन गव्हाणे , हवेली तालुका क्रीडा आघाडी अध्यक्ष विजय जाचक , हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदीप सातव, युवा मोर्चाचे शिरूर तालुका अध्यक्ष रोहित खैरे ,माजी उपसरपंच प्रदीप काशीद,रवींद्र गव्हाणे, शि. ता.युवा मोर्चा सरचिटणिस उपाध्यक्ष अमोल गव्हाणे,शि. ता. चिटणिस संपत गव्हाणे , परशुराम गव्हाणे ,दिपक गव्हाणे, उमेश गव्हाणे सतिश गव्हाणे , युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.