जावेद अख्तर यांच्याकडून ओबामांची तुलना शहाजहान सोबत; विवेक अग्निहोत्री म्हणाले….
जावेद अख्तर या ट्विटमुळे सोशल मीडियावर त्यांना पुन्हा एकदा ट्रोल केलं जातंय. या ट्विटमध्ये त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची तुलना बादशहा शाहजानसोबत केलीय.
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध लेखक जावेद अख्तर हे वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत नेहमीच स्पष्टपणे व्यक्त करत असतात. त्यामुळे ते अनेकदा ट्रोल सुद्धा झाले आहेत. त्यानंतर आता जावेद अख्तर यांनी नुकतंच शेअर केलेल्या एका ट्विटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा उल्लेख करताना त्यांची तुलना बादशहा शहाजहानसोबत केलीय. त्यांच्या ट्विटमुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येतंय. यातच फिल्ममेकर विवेक अग्निहोत्री यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलीय.
जावेद अख्तर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट शेअर करत शहाजहान भारतीय असल्याचं ते सांगत होते. इतकंच नव्हे तर शहाजहानमध्ये राजपूतांचं रक्त असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, “ओबामाचे पिता हे केनियाचे होते…त्यांच्या काकी सुद्धा आजही केनियामध्येच राहतात…ओबामा यांचा जन्म अमेरिकेत झाला म्हणून त्यांना निवडणूकीत उभं राहण्याचा अधिकार मिळाला…शहाजहान हे भारतातल्या पाचव्या पिढीतील होते…त्यांची आजी आणि आई सुद्दा राजपूत घराण्यातल्या होत्या…पण ते आजही शहाजहानला विदेश म्हणतात.” जावेद अख्तर यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली.