दादागिरी करणा-या माणसाला पाडायचंय; अतुल देशमुखांचा निश्चय
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा
चांडोली । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यातील राजगुरुनगर परिसरातील चांडोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये डिजिटल सिमुलेशन लॅबचे आणि अत्याधुनिक सीएनसी सिम्युलेटर चे अनावरण शनिवारी (दि. ३) करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात हे अनावरण करण्यात आले.
भारत फोर्ज कंपनीच्या सहकार्याने आणि पुण्यातील सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजी यांच्या तांत्रिक साहाय्याने या लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. आयटीआय सीएनसी सिम्युकट सीएनसी सिम्युलेटर मुळे अत्यंत जोखमीच्या व महागड्या सीएनसी किंवा व्हीएमसी मशीनवर काम करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना संगणकावर संबंधित पार्ट्सचा प्रोग्रॅम बनवून तो बनवण्याचे प्रात्याक्षिक घेता येते. या प्रशिक्षणामूळे विद्यार्थ्यांना भविष्यात मशीनरींच्या जमान्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवता येणार आहे.
यावेळी भारत फोर्ज कंपनीचे सीएसआर विभागाच्या प्रमुख डॉ लीना देशपांडे, आय एम सी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सदस्य पंजाबराव ताले, पुणे विभागाचे सहसंचालक रमाकांत भावसार,पुणे जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उदयशंकर सुर्यवंशी, शिकाऊ उमेदवारी सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार दतात्रय गरदडे, आय. टी. आय. माणिकडोहचे प्राचार्य दतात्रय जगताप, सीएसआर प्रतिनिधी प्रणव टोंगे, सीमुसॉफ्टचे कार्यकारी संचालक सुनील चोरे, अरबाय टेक्नॉलॉजीचे जावेद, प्रभारी प्राचार्य कमलेश पवार आदीसह उद्योग क्षेत्रातील, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, “आजचे युग यांत्रिकीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या डिजीटल युग आहे. प्रत्येक व्यवसायात नवीन टेक्नॉलॉजी येऊ लागले आहेत. जागतिक बदल होत असताना या आधुनिक युगात जगताना हाताला काम मिळाले नाही तर बरोजगारी वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे स्पर्धेच्या युगात नवीन टेक्नॉलॉजी नवतंत्रज्ञान आपण आत्मसात करणे काळाजी गरज आहे.
नवीन प्रशिक्षणार्थीने स्वतः चे व्यक्तीमत्व विकसित करण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. आपल्या जीवनात पुढे जाताना स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी अपार मेहनत आणि कष्टाला कौशल्याची जोड देत मार्गक्रमण केले तर यशाला गवसणी घालता येते.
कार्यक्रमात बोलताना डॉ. लीना देशपांडे यांनी भारत फोर्ज कंपनीचे उदिष्ट व भविष्यातील उपक्रमाबाबत प्रशिक्षणार्थी हाच केंद्र बिंदू मानुन, डिजिटल सीएनसी सिमुलेशन लॅबची निर्मीती केली असल्याचं सांगितलं.
संचालक दिगांबर दळवी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, “खेड तालुक्याच्या पुर्व भागात सेझ मध्ये विविध कंपन्या येत आहेत. स्थानिक बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या कुंटुबातील युवक युवतीसाठी प्रशिक्षण कौशल्यासाठी चांडोली आयटीआय या प्रशिक्षण संस्थेबरोबरोबर करार करुन २००७ पासुन भारत फोर्ज कंपनीने पाच ट्रेड सुरु केले आहेत. यामुळे हजारो युवकांना प्रशिक्षण देऊन कंपनीने दिलेले योगदाना निश्चितच कौतुकास्पद आहे.
पुणे विभागाचे सहसंचालक रमाकांत भावसार यांनी चांडोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील १४ व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी आवश्यक रिक्त जागावर शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी आणि आयटीआय मधील आवश्यक पायाभुत सोयीसुविधा साठी निधी वेळेवर पुरवण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले.
उत्पादन क्षेत्रातील वाढत्या कुशल मनुष्यबळाच्या मागणीसाठी हे आधुनिक तंत्रज्ञान स्थानिक विद्यार्थ्यांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन सिम्यूसॉफ्ट चे संचालक सुनील चोरे यांनी केले .
या कार्यक्रमाचे संयोजन शिक्षक इरफान शेख, उत्तम सावंत, संजय कावले, सतीश शेंडे, विष्णु पवार, शैलजा दहिवळ, ज्योती गोरे, विठ्ठल दौंडकर, संतोष बिन्नर, तोडकर, राम शिंदे, अजित शिंदे, राहुल थोरवे आणि सोनाली घुमटकर आदींनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य कमलेश पवार यांनी केले. सुत्रसंचालन सायली कहाणे व रुपाली भुजबळ यांनी केले. उदयशंकर सुर्यवंशी यांनी आभार मानले.
“जागतिक बदल होत असताना या आधुनिक युगात जगताना हाताला काम मिळाले नाही तर बरोजगारी वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे स्पर्धेच्या युगात नवीन टेक्नॉलॉजी नवतंत्रज्ञान आपण आत्मसात करणे काळाजी गरज आहे”.
– दिलीप मोहिते पाटील (आमदार, खेड-आळंदी विधानसभा)