मकरसंक्रांतीनिमित्त गाडकवाडीमध्ये महिला मेळावा उत्साहात संपन्न
मेळाव्यात उद्योजकता विकास, शेतीपूरक व्यवसाय अशा विषयांवर महिलांना मार्गदर्शन
गाडकवाडी (ता.खेड) । सह्याद्री लाइव्ह । गाडकवाडी येथे दापोडीतील श्रीमती. सी. के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा “विशेष श्रमसंस्कार शिबिर” हा सामाजिक उपक्रम पार पडला. राजगुरुनगर येथील “मुंबई माता बाल संगोपन केंद्र”यांच्या सौजन्याने या सामाजिक उपक्रमांतर्गत “महिला मेळावा” आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महिलांना उद्योजकता विकास, शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन अशा महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले तसेच आरोग्य जागृती शिबिर यावेळी घेण्यात आले होते.
शिबिरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम ग्रामस्थांसाठी राबविण्यातल आले असून त्यामध्ये “मकर संक्रांत “निमित्त सोमवारी (दि. १५) दुपारी गाडकवाडी गावातील महिलांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी उद्योजकता विकास, शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन आणि आरोग्य जागृती शिबिर यावेळी घेण्यात आले होते. “मकर संक्रांति “निमित्त या महिला मेळाव्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून, तिळगुळ वाटप केले.
या महिला मेळाव्यामध्ये ‘मुंबई माता बाल संगोपन केंद्राच्या” संचालिका शर्मिली सांडभोर, शिंदे मॅडम, वाघोले मॅडम, यांनी महिला मेळाव्यामध्ये उपस्थित महिलांना शेतीपूरक व्यवसाय, उद्योजकता विकास, आणि आरोग्य जागृती या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना, “महिलांनी पुढे येऊन आपली प्रगती साधली पाहिजे, आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, आपल्या मुलांसाठी पोषक आहार पुरवला पाहिजे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, शेतीला जोडधंदे म्हणून दुग्ध व्यवसाय, मधुमक्षिका पालन, गांडूळ खत निर्मिती या उद्योगांतून स्वयंरोजगार निर्माण करून स्वतःची प्रगती साधली पाहिजे” असे मार्गदर्शन मुंबई माता बाल संगोपन केंद्राच्या संचालिका आणि इतर मार्गदर्शकांनी केले.
दापोडी पुणे येथील श्रीमती सी. के. गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे “विशेष श्रमसंस्कार शिबिर” रविवार दि. १४ जानेवारी ते शनिवार दि. 20 जानेवारी २०२४ या कालावधीत गाडकवाडी या ठिकाणी संपन्न होत आहे. या शिबिराचे उद्घाटन रविवारी (दि.१४) सायंकाळी ४:०० वाजता झाले. या महिला मेळाव्यासाठी शंभरहून अधिक महिला व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी केले. तर त्यांना प्रा. सिद्धार्थ कांबळे प्रा. वैभव वरडूले प्रा. शीला येलमेळी, लक्ष्मण कोहिणकर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी दीक्षा गायकवाड, काजल काटे, रत्नप्रभा मोरे, यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रा. शीला येलमेळी यांनी आभार मानले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES