मराठा आरक्षणासाठी खेड तालुक्यात फिरते साखळी उपोषण
गुळाणी गावच्या ग्रामस्थांचा उपोषणाला उत्फुर्त प्रतिसाद
गुळाणी (ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तालुकाभरात साखळी उपोषण आयोजित केले आहे. बुधवारी (दि. ३) खेड तालुक्याच्या पुर्व पट्ट्यातील गुळाणी गावात हे साखळी उपोषण पार पडले.
जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून सुरुवातील ९० दिवस राजगुरूनगर येथे साखळी उपोषण सुरू होते. आत्ता तालुक्यात गावोगावी 27 दिवसांसाठी फिरते साखळी उपोषण खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
या साखळी उपोषणासाठी खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश राक्षे, नगरसेवक शंकर राक्षे तसेच हरिप्रसाद खळदकर, चेतन पिंगळे, दशरथ वाळुंज, राम महाराज रोडे, भरत वायाळ, बाळासाहेब बेरंगे, भिकाजी ढेरंगे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपोषणस्थळावर सटवाजी बाबा भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. गुळाणी गावातील सर्व मराठा बांधवांनी उपोषणाला उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. तसेच 20 जानेवारी नंतर होणा-या पायी आरक्षण दिंडीमध्ये सहभागी होण्याचा निश्चय यावेळी ग्रामस्थांनी केला. तळेगाव ते मुंबई या आंदोलन दिंडी मध्ये खेड तालुका सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. तालुक्याच्या पुर्व भागातून प्रत्येक गावातून किमान १ ट्रक १ ट्रॅक्टर या पायी दिंडीमध्ये सहभागी होणार असल्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं.