साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयात “संविधान गौरवदिन” साजरा
संविधान गौरवदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
राजगुरुनगर (ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयामध्ये “संविधान गौरवदिन” साजरा करण्यात आला. संविधान गौरव दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले होते. याचबरोबर यावेळी मुंबईमध्ये २६/११/२००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली.
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात संविधान गौरवदिनाचे आयोजन करण्यात आले होते.
संविधान गौरवदिनाच्या निमित्ताने संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संविधान जागरूकता व्हावी या उद्देशाने ऑनलाईन प्रश्नोउत्तर स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली. महाविद्यालयातील 85 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
यावेळी साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, कला विभाग प्रमुख प्रा. साईनाथ पाचारणे, प्रा. एम. पी. कोल्हे, प्रा. ए. ए. इंदायिस, प्रा. एस. एल. बुरुड, प्रा. जी. जी. आहेरकर, प्रा. एस. एस. देशमुख प्रा. पी.एन. गदादे, प्रा. ए. एच. इनामदार, प्रा. एल. बी. काठे, प्रा. एस. एस. खराडे, प्रा. ए. जे. शेख, प्रा. सोनाली नाईकरे, प्रा. पी. पी. चौधरी, प्रा. आर. आर. जाधव, प्रा. के. डी. मांडगे आदी प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. एच. एम. जरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जी. जी. आहेरकर यांनी केले आणि प्रा. एस. एस. देशमुख यांनी संविधान उद्देशिका वाचन केले. प्रा. एस. एल. बुरुड यांनी आभार मानले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES