डॉ. सायरस पूनावाला हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य सोहळा उत्साहात संपन्न
स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन
पुणे | सह्याद्री लाइव्ह | पुणे कॅम्प मधील डॉ. सायरस पूनावाला हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. इम्तियाज मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. सायरस पूनावाला हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका स्नेहल घाटगे, विलू पूनावाला इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका यास्मिन पटाईत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आहिर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शेख, अंकूर पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गवारे, अध्यापक – अध्यपकेतर वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रगीत झाल्यानंतर एन. सी. सी. व आर. एस. पी. च्या पथकाने मानवंदना देऊन संचलन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. इम्तियाज मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ध्वजगीत व समूहगीत सादर केले. समृद्धी ढावरे या विद्यार्थिनीने गीतगायन केले.
आठवी अ च्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर समूह नृत्य सादर केले. यावेळेस मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर आधारित विद्यार्थ्यांनी तयार केलेले हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES