स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी क्लबच्या वतीने पाडळी माध्यमिक शाळेला बेंचेस आणि टेबल प्रदान
यशवंत विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट व रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, पाडळीतील मामासाहेब मोहोळ माध्यमिक विद्यालयाला बेंचेस व टेबल देण्यात आले. यासाठी अँमटेक मायक्रो सिस्टिम्स प्रा. लि. कंपनीचे एम. डी. व डिस्ट्रिक्ट ३१३१ चे असिस्टंट गव्हर्नर अनंत तीकोणे यांचे सौजन्य लाभले.
हा कार्यक्रम रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे २०२४-२५ चे नियोजित प्रांतपाल शितलभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला होता.
ध्वजपूजन रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष ॲड. दत्ता रुके, सेक्रेटरी डॉ. कुणाल तांबे, रोटरी क्लब पुणे ईस्टचे विनय पाटील, सेक्रेटरी संध्या बोराणा, यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, नियोजित प्रांतपाल शितलभाई शहा, रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टचे अध्यक्ष साहिल शहा, अजित वाळुंज, जयश्री पडवळ, अपर्णा आहेर, विजय राठोड, रमेश शिंगवी, यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी शितल शहा, दत्ता रुके, साहिल शहा, अनंत तीकोणे, संपत बालघरे, बाबाजी काळे यांची भाषणे झाली. “विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पहावीत व ती साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील रहावे.” असे मनोगत शितल शहा यांनी व्यक्त केले. अनंत तीकोणे यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यालयाचे कौतुक केले व विद्यालयाला आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी कटिबद्ध असल्याचे सांगितले. “गावाचा, पर्यायाने देशाचा विकास साधायचा असेल तर तरुणांनी एकत्र येणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी केले.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रशस्तीपत्र देऊन गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमासाठी रोटरी क्लब राजगुरुनगरच्या माजी अध्यक्ष जयश्री पडवळ, अविनाश कोहिनकर, अविनाश कहाणे, सतिश नाईकरे, नरेश हेडा, अजित वाळुंज, जितेंद्र गुजराती, डॉ. अमित ओसवाल, डॉ. आशिष गुजराती, अपर्णा आहेर, सुधीर मांदळे, विठ्ठल सांडभोर, उत्तम कुंभार, रागिनी शहा, मनीषा तीकोणे, संध्या बोराणा, प्रकल्प प्रमुख वैशाली पाटील, विनय पाटील, विजय राठोड, रमेश शिंगवी, अभय देसाई, नरेश लोहार, राहुल शहा, मनोज जगदाळे, अरुणा देसाई, मुग्धा लोहार, मामासाहेब मोहोळ संस्थेचे संचालक हरीश्चंद्र बालघरे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दत्ता सातपुते, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक इसुफ शेख यांनी केले, सूत्रसंचालन उपशिक्षक बाबाजी आढवळे व सुचिता तोडकर तर आभार मधुकर गिलबिले यांनी मानले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES