रोटरी क्लब ऑफ पुणे मार्फत शुद्ध पाण्याच्या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न
खेड । सह्याद्री लाइव्ह । रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगर मार्फत खेड तालुक्यातील पश्चिम पट्यातील अतिदुर्गम बच्चेवाडी गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचे एटीम युनिटचे रविवारी लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर (जलतज्ञ) सतीश खाडे आणि डिस्ट्रिक्ट डायरेक्टर वसंतराव माळुजकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे २०२५-२६ चे प्रांतपाल संतोष मराठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले.
हा प्रकल्प रोटरी क्लबच्या २०२२-२३ वर्षातील लोकमान्यनगरच्या प्रेसिडेंट डॉ. मधुरा विप्र यांच्या कारकिर्दीत बसवण्यात आला होता. क्लब बरोबरच प्रशांत कलंत्री आणि सुंदरम वरदान यांचे अर्थसहाय्य या प्रकल्पास लाभले आहे.
यावेळी रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ. मधुरा विप्र, विद्यमान अध्यक्ष मनोज आगरवाल, भावी अध्यक्ष अविनाश तरवडे, माजी अध्यक्ष रविंद्र विप्र, डायरेक्टर अजय वाघ, उप प्रांतपाल वासवी मुळे, प्रकाश पुणतांबेकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
बच्चेवाडी गावात पाणीपुरवठा योजना होती पण शुद्ध पाणी मिळत नव्हते. या शुद्ध पाण्याचा प्रकल्पामुळे गावातील सर्व नागरिकांना शुद्ध पाणी मिळत असून त्यांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे. गावातील महिलांनी या बाबतीत पुढाकार घेऊन डॉ. मधुरा विप्र यांना साकडे घातले होते.
प्रमुख पाहुणे संतोष मराठे यांनी ग्रामीण भागात असे सुत्य उपक्रम करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे तसेच या गावात हॅपी अंगणवाडी, हॅप्पी स्कुल, महिला बचत गटासाठी रोजगार निर्मितीसाठी उपक्रम, पशु पालन, दुग्ध व्यवसाय वाढीसाठी रोटरी कटिबद्ध राहील असे आपल्या भाषणात नमूद केले.
वसंतराव माळुजकर यांनी हॅप्पी व्हिलेजची संकल्पना मांडून या गावात सोलर स्ट्रीट लाईट, वृक्षारोपण करून पर्यावरण समतोल राखणे, आरोग्य विषयक प्रकल्प करून हे गाव निरोगी व आनंदी करण्यासाठी सर्वतोपरी मदत रोटरी डिस्ट्रिक्ट करेल याची ग्वाही दिली.
सतिश खाडे यांनी जमिनीमधील पाण्याचा स्त्रोत वाढविण्यासाठी चर खोदणे, बंधारा बनविणे, आधुनिक शेती करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू असे सांगितले.
रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगर मार्फत या पुढील २-३ वर्षात या गावामध्ये शेजारील आनंदी टेकवडी गावाप्रमाणे सर्व गोष्टींच्या सुविधा उपलब्ध करून देऊन हे गाव आनंदी करण्यासाठी प्रयत्न करू असा निश्चय डॉ मधुरा विप्रा, मनोज आगरवाल, अविनाश तरवडे यांनी त्यांच्या भाषणात सांगितला.
महिला सरपंच सारीका पवार व उपसरपंच रवींद्र बच्चे यांनी सर्व प्रमुख पाहुणे व पदाधिकारी यांचा समस्त ग्रामस्थांतर्फे सत्कार करून गावाच्या विकासासाठी पाहिजे ती मदत करू याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला समस्त बच्चे वाडीचे ग्रामस्थ, महिला भगिनी, राजगुरूनगर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व सी. एस. आर. डायरेक्टर अजित वाळुंज, शिरोली गावचे माजी सरपंच रविंद्र सावंत, फ्रेंडशिप 92 चे प्रविण सुतार, ज्ञानेश्वर बच्चे, सुदर्शन बिबवे, रामचंद्र बागडे, विशाल बच्चे, बाळासाहेब बच्चे, पुण्यातील महिला भगिनी खाडे, अगरवाल, वाघ आणि तरवडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्ष बच्चे यांनी केले व आभार प्रदर्शन बाळासाहेब बच्चे यांनी केले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES