माईर्स एमआयटी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहाचे आयोजन
आळंदी । सह्याद्री लाइव्ह । माईर्स एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. २४ जुलै ते २८ जुलै या कालावधीत हा कार्यक्रम पार पडला. या कालावधीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे डीन डॉ. पराग काळकर यांनी केले. त्यांनी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागरूकता” या विषयावर यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रा. पल्लवी बोंगाणे आणि टीवायबीबीए (सीए) ची विद्यार्थिनी मिताली कांबळे यांनी डॉ. पराग काळकर यांची मुलाखत घेतली.
या कालावधीत महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रील स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर सादरीकरण स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. २५ जुलै रोजी रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात २१ विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने सहभाग घेतला होता.
२६ जुलै रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १२४ निबंध विद्यार्थ्यांकडून प्राप्त झाले. पोस्टर सादरीकरण स्पर्धा २७ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. २८ जुलै रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
३१ जुलै रोजी समापन समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्राचार्य डॉ. बी. बी. वाफरे, उपप्राचार्य डॉ. मानसी अतितकर आणि प्रा. अक्षदा कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या सप्ताहचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. वाफारे याच्या मार्गदर्शन खाली करण्यात आले. महाविदयालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विभागाच्या समन्वयक डॉ. अर्चना आहेर यांनी सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES