एमआयटी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पुस्तक समीक्षा स्पर्धेचे आयोजन
आळंदी । सह्याद्री लाइव्ह । माईर्स एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन स्तरावर विध्यार्थासाठी पुस्तक समीक्षा स्पर्धा पार पडली. महाविद्यालयातील बीबीए आणि बीबीए-आयबी विभागातील राईफ रॉ क्लबच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावणे व विचार कौशल्ये विकसित करणे व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे त्यांना साहित्य वाचण्यासाठी आणि साहित्यिक ग्रंथांचे विश्लेषण करण्यास प्रोत्साहित करणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील विविध विभागातील ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
पुस्तक समीक्षा स्पर्धेचे विश्लेषण आणि परीक्षण सेवानिवृत्त विपणन व्यवस्थापक सुधीर मोघे यांनी केले, या स्पर्धेची समन्वयकाची जबाबदारी विद्यार्थी आकाश जांगीड, सानिया इनामदार, तनिष्का वीर, देवप्रिया राजेश यांनी केली.
स्पर्धेचे उद्घाटन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. वाफारे यांनी केले. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा समन्वयक प्रा. आकांक्षा लांडगे व विभाग प्रमुख डॉ. मंगेश भोपळे यांनी मार्गदर्शन केले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES