मधुकर गिलबिले गुरुजी यांना “साहित्य गौरव पुरस्कार” जाहीर
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर येथील शिक्षक, मधुकर गिलबिले यांची “साहित्य गौरव पुरस्कार २०२३” करीता निवड झाली आहे. इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे होणा-या सातव्या संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष जगदिप वनशिव यांच्याकडून मधूकर गिलबिले यांना त्यांचे निवडपत्र मिळाले आहे.
मधुकर गिलबिले यांचे साहित्य क्षेत्रात काम मोठे आहे. चार पुस्तकांचे लेखन, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण मार्फत साहित्य क्षेत्रात कार्य, तसेच राज्यातील विविध साहित्य संमेलन, कवी संमेलन यात सक्रिय सहभाग, अशा साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल मधुकर गिलबिले यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. सर्व स्तरातून याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन
इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथील संत तुकाराम महाराज पालखी तळ या ठिकाणीं रविवारी (दि. २०) सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजीत करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात साहित्य, नाट्य चित्रपट कला, पत्रकारिता, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या एक दिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटक आमदार दत्ता भरणे, प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले त्याचबरोबर जलदगती हायकोर्ट माझगावचे न्यायाधिश वसंतराव पाटील, पुणे परिवहन विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आकळे, सिने अभिनेता बाबा गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, संमेलनाचे अध्यक्ष माजी पोलीस अधिकारी सिताराम नरके, गझलकार बाळासाहेब गिरी, माजी जिल्हाधिकारी अशोक जाधव, पुणे वनविभाग मुख्यालयाचे लेखापाल लक्ष्मण शिंदे, वृत्तनिवेदिका जयश्री सोनवणे, संस्थापक अध्यक्ष विजय गायकवाड व संमेलनाचे कार्याध्यक्ष, रानकवी जगदीप वनशिव (निवेदक) आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES