खेड तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेत्तर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैशाली चौधरी पाटील
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी वैशाली चौधरी पाटील आणि सचिवपदी ज्ञानेश्वरी तितर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच उपाध्यक्षपदी रामदास रेटवडे तर खजिनदारपदी लतीफ शेख यांचीही निवड बिनविरोध झाली.
सर्व पदाधिका-यांचा संस्थापक अध्यक्ष दिलीप ढमाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष रविंद्र चौधरी पाटील, संचालक प्राचार्य संजय बोरकर, सचिव पवार सर, मुख्याध्यापक विष्णू मेदगे, मुख्याध्यापक उत्तम पोटवडे, किशोर भगत, अरविंद गवळे, विष्णू काळे, पांडूरंग वारे, पांडुरंग पवळे, पुजारी सर, योगेश माळशिरसकर, राजेंद्र पाचपुते, व्यवस्थापक संपत मलघे, युवराज साळुंके उपस्थित होते.
“सर्व शिक्षक सभासदांनी माझ्यावर विश्वास ठेवून अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे सोपविल्याबद्दल मी आभारी आहे. पतसंस्थेचा कारभार पारदर्शीपणे करुन जास्तीत जास्त सभासद वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करु”.
– अध्यक्षा वैशाली चौधरी पाटील
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES