खेड तालुक्यातील २७ गावांच्या पोलीस पाटील पदांसाठी १२२ उमेदवारी अर्ज दाखल
१ ऑगष्टला लेखी परीक्षा होणार
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यामध्ये पोलीस पाटील पदासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. तालुक्यातल्या २७ गावांच्या पोलीस पाटील पदांसाठी १२२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सहा गावांमधून एक एकच अर्ज आले आहेत तर आठ गावांमध्ये एकही उमेदवार नाही.
३५ पैकी २७ गावांच्या प्राप्त झालेल्या एकूण १२२ अर्जांची छाननी १९ ते २१ जुलैपर्यत करण्यात येणार आहे. परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी २४ जुलैला प्रसिद्ध केली जाईल. परीक्षा प्रवेशपत्र २५ ते ३१ जुलैपर्यंत मिळणार आहे. या पदासाठी १ ऑगष्टला ८० गुणांची लेखी तर ७ ते ११ ऑगष्ट दरम्यान तोंडी परीक्षा होणार आहे.
कमान, बूरसेवाडी, वांजाळ, गडद, मंदोशी, वडगाव पाटोळे, वाकळवाडी आणि कढधे या आठ गावांच्या पोलीस पाटील पदासाठी भटक्या जमातींना आरक्षण जाहीर झाल्यामुळे गावात एकही उमेदवार नाही. येणिये खुर्द, गोलेगाव, सिद्धेगव्हाण, चर्होली खुर्द, रासे, चिंचोशी या सहा गांवामध्ये आरक्षण निहाय एकच उमेदवारी अरज दाखल झाला आहे. तरिही लेखी परीक्षेतील ४५ टक्क्यांच्या वर मिळालेल्या गुणांवरच त्यांची निवड अंतिम मानली जाणार आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES