राज्यात पावसाची उघडझाप; पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
पुण्यात बहुतांश ठिकाणी ऑरेंज अलर्ट
पुणे । सह्याद्री लाइव्ह । देशातल्या ब-याचशा भागात मान्सून सक्रीय झालेला आहे. अनेक ठिकाणी पावसाचे जोरदार आगमन झालेले आहे. तर ब-याचशा भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा अजुनही कायम आहे. राज्यात आज काही भागात पावसाची उघडीप असली तरी पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला होता.
पावसाची उघडझाप
आज राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी पाऊस पुर्णपणे उघडलेला होता. नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. अमरावती आणि अकोला जिल्ह्यातही काही ठिकाणी थोडफार पाऊस पडला. मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांबरोबरच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांप्रमाणेच खानदेशातही बहुतांशी ठिकाणी आज पाऊस नव्हता. राज्यात बहुतांश ठिकाणी दिवसभरामध्ये पावसाची उघडझाप सुरू होती.
पुण्यात बहुतांश ठिकाणी ऑरेंज अलर्ट
कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तर कोकणातील सिंधुदूर्ग आणि ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नाशिक तर संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता.
आज राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. आज तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES