सहायक प्राध्यापक पदासाठी आता पीएचडी बंधनकारक नाही; युजीसीचा निर्णय
१ जुलै पासून नवीन नियमावली लागु
नवी दिल्ली । सह्याद्री लाइव्ह । देशातल्या उच्चशिक्षण संस्थांमधील सहायक प्राध्यापकांच्या निवडीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) यासंदर्भात नवीन नियमावली सादर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार देशातल्या उच्चशिक्षण संस्थांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी किमान पात्रता नेट, सेट करण्यात आली आहे. या पदासाठी आता पीएचडी ची सक्ती नसून ती वैकल्पिक पात्रता असणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी सोशल मिडियावर ही माहिती दिली. या नव्या नियमावलीसंदर्भातील अधिसुचना आयोगाने ३० जूनला जारी केली असून १ जुलै पासून ही नियमावली लागु झाली आहे.
यापुर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने सहायक प्राध्यापक पदासाठी पीएचडी बंधनकारक केली होती. त्यानंतर सध्याची परिस्थिती पाहता रिक्त पदसंख्या आणि उमेदवारसंख्या लक्षात घेत आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नेट, सेट झालेल्या प्राध्यापकांना संधी मिळणार असून शिक्षणसंस्थांमधील रिक्त पदभरतीही वेगाने होईल अशी अपेक्षा आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES