आळंदीमध्ये एम. आय. टी. तर्फे दोन दिवसीय “व्यवस्थापन सप्ताह” साजरा
आळंदी । सह्याद्री लाइव्ह । एम. आय. टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी येथील व्यवसाय प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाने (बी. बी. ए. आणि बी. बी. ए. आय. बी.) “व्यवस्थापन सप्ताह – इप्सम -२०२३” या आंतर महाविद्यालयीन कार्यक्रमाचे आयोजन दि. २० आणि २१ मार्च २०२३ रोजी केले होते.
ह्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना उद्योजकीय प्रोत्साहन देणे, त्यांना चिकित्सक बुद्धीने विचार करण्यास प्रेरित करणे आणि विद्यार्थ्यांचे ज्ञान, प्रतिभा, कौशल्ये दाखवण्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता. ह्या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये मनी आयलँड (शार्क टॅंक), बिझनेस क्विझ, (व्यावसायिक प्रश्नमंजुषा), वादविवाद स्पर्धा, डिटेक्टिव्ह गेम, पेपर ट्रेडिंग, १ मिनिट स्पीच, १ मिनिट गेम, प्रॉडक्ट व फूड स्टॉल इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांसाठी पुणे शहर व शहराबाहेरील १८ महाविद्यालये, व्यवस्थापन संस्था व विद्यापीठांमधून २२८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे सहप्रायोजक म्हणून मुनोत फर्म मनमाड, डी. एस. क्रीएशन्स मनमाड, प्रथमेश ज्वेलर्स, खेड पुणे, वाय. ए. टेकनोसोलुशन्स, पुणे, प्रिंट हब आळंदी, संदीप आर्टस्, आळंदी , श्री गणेश डेव्हलपर्स, विश्रांतवाडी, हॉटेल विश्रांती, पुणे यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आर्थिक मदत केली. कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे तसेच प्रमुख पाहुणे प्रथमेश जवळेकर, शंतनू लाकळ, सतीश टिंगरे, सचिन दूसंगे, दीक्षा संचेती, विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा कार्यक्रम बीबीए व बी. बी. ए. आय. बी. च्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक प्रस्तुत करण्याच्या उद्देशाने आयोजित केला होता.
या कायक्रमासाठी व्यवसाय प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश भोपळे, कार्यक्रम समन्वयक डॉ. शैलेंद्र पाटील, डॉ. अमोल माने, प्रा. आकांक्षा लांडगे डॉ. शरद कदम डॉ. रितूजा देशपांडे, प्रा. हनुमंत शिंगाडे, प्रा. निर्मल बाबू द्विवेदी तसेच विद्यार्थ्यांनी कष्ट घेतले. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उपप्राचार्या प्रा. अक्षदा कुलकर्णी व डॉ. मानसी अतितकर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना प्राचार्य, उपप्राचार्य व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे प्राचार्य, शिक्षक तसेच प्रमुख पाहुण्यांनी खूप कौतुक केले.