‘मेलडी क्वीन’ आशाताई भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । संगीत क्षेत्रातील अजरामर गायिका लता मंगेशकर यांच्या भगीनी बॉलीवूडच्या ‘मेलडी क्वीन’ पद्मविभूषण आशाताई भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. होणा-या एका भव्यदिव्य सोहळ्यात हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा शुक्रवारी २४ मार्च 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता पार पडणार आहे.
कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अश्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते. हा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते प्रदान केला जाईल. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान सभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री, सुधीर मुनगंटीवार, मुंबई जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.