विवाहितेच्या चारित्र्यावर संशय; सासरच्या सात जणांवर गुन्हा
बेकरी दुकान टाकण्यासाठी माहेरुन पाच लाख रूपये आणण्याची केली होती मागणी
म्हाळुंगे । सह्याद्री लाइव्ह । माहेरून पैसे आणले नाही म्हणून सासरच्या मंडळींनी महिलेला वेळोवेळी शिवीगाळ करीत मानसिक छळ केला. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत बेकरी टाकण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणून छळ केला. कुरुळी येथे प्रकार १६ नोव्हेंबर २०१६ ते डिसेंबर २०१८ दरम्यान हा प्रकार घडला.
या प्रकरणी पीडित महिलेने म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी अभिजीत प्रकाश कांबळे (वय ३२), प्रकाश वामन कांबळे (वय ५८), सनी प्रकाश कांबळे (वय ३८), सचिन प्रकाश कांबळे, मधू सचिन कांबळे (वय ३४ सर्व रा. कुरूळी, ता. खेड ), यांसह दोन महिला आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे गेल्या काही काळापासून पीडित महिलेवर बेकरीचे दुकान टाकण्यासाठी पाच लाख रूपये माहेरून आणण्यासाठी दबाव टाकत होते. महिलेने पैसे आणून न दिल्यामुळे वारंवार तिला शिवीगाळ आणि मारहाण केली जात होती. ब-याच दिवसांपासून महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन घरात तिचा छळ केला जात होता. या जाचाला कंटाळून पीडित महिलेने म्हाळुंगे पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक गायकवाड तपास करीत आहेत.