मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी २० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी घेतली सदिच्छा भेट
by
sahyadrilive
December 14, 2022 1:22 PM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। जी २० परिषद विकास कार्यगटाच्या बैठकांना आजपासून येथे सुरूवात झाली. त्यानिमित्त मुंबई दौऱ्यावर आलेले परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.
सायंकाळी ४च्या सुमारास मंत्रालयात कांत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जी २० परिषदेच्या विविध बैठका आणि त्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. मुंबईतील पहिल्या बैठकीच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कांत यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.