साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयात एचआयव्ही. एड्स जनजागृती शिबिर संपन्न
राजगुरूनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरूनगर येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण रुग्णालय चांडोली यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने एचआयव्ही एड्स जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराअंतर्गत महाविद्यालयातील १५६ विद्यार्थ्यांची एचआयव्ही एड्स तपासणी करण्यात आली. साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयायाचे प्राचार्य डॉ. एच. एम. जरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, सचिव हरिभाऊ सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने एचआयव्ही एड्स जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, जेष्ठ प्रा. साईनाथ पाचारणे, प्रा. डॉ. एस. एम. जगताप, प्रा. डॉ. उमेश भोकसे, प्रा. टी. बी. वेहळे, प्रा. एम. पी. कोल्हे, प्रा. ए. ए. इंदायीस, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. जी. आहेरकर, प्रा. धनवर्षा बोऱ्हाडे, प्रा. एस. एल. बुरुड, प्रा. एस. एस. देशमुख, प्रा. शिवम कदम, प्रा. प्राजक्ता गदादे, प्रा. अलफिया इनामदार, प्रा. ललिता काठे यांच्यासह साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालय चांडोली येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी अल्ताफ पठाण, मनाली नाईक, प्रज्वल बोराडे, आयान शेख यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. जी. आहेरकर यांनी केले तर आभार प्रा. एस. एल. बुरुड यांनी मानले.