दिग्गज अभिनेते स्व. विक्रम गोखलेंचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
by
sahyadrilive
December 1, 2022 2:28 PM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले शनिवारी 26 ऑक्टोबर रोजी वयाच्या 77 वर्षी निधन झाले. अभिनयातील पाच दशकांच्या त्यांच्या सुपर्ण अशा कारकिर्दीचा अंत झाला. त्यांच्या आयुष्यातील त्यांचा शेवटचा ठरलेला ‘सूर लागू दे’ हा शेवटचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
प्रवीण विजया एकनाथ बिरजे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये हे दोन दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर सुप्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेत्री रीना अगरवालही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
निर्माते अभिषेक ‘किंग’ कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.