उद्योगासाठीच्या थेट कर्ज योजनेकरिता अनुसूचित जातीतील व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मुंबई उपनगरमधील अनुसूचित जातीतील व्यक्तींना उद्योग तसेच व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपये इतके थेट कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मिनी मादींग, दानखनी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी, मादगी या १२ पोट जातींतील थेट कर्ज योजनेअंतर्गत लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या अर्जदारांनी अटी व शर्ती यांची पूर्तता करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, मुंबई उपनगर शहर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. 33, वांद्रे (पू), मुंबई- 4000 051 या पत्त्यावर अर्ज पाठवावेत, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.