नदाव नफिल यांच्या टिकेमुळे काश्मीर फाईल्स पुन्हा एकदा चर्चेत
by
sahyadrilive
November 29, 2022 10:20 AM
गोवा । सह्याद्री लाइव्ह । नुकताच गोव्यात “IFFI film festival 2022” पार पडला. नेहमीप्रमाणेच जगभरातून हा महोत्सव पाहण्यासाठी अभ्यासक, प्रेक्षकांनी गर्दी केली होती. शेवटच्या दिवशी महोत्सवाचे प्रमुख आयोजक आणि चेअरमन नदाव नफिल यांनी काश्मीर फाईल्स या चित्रपटावर आपले मत व्यक्त केले त्यानंतर त्यांच हे मत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.
नफिल म्हणाले, “काश्मीर फाईल्स हा चित्रपट इफ्फीच्या महोत्सवात आलाच कसा, तो या महोत्सवामध्ये येणं ही मोठी धक्कादायक बाब आहे. याचे कारण म्हणजे तो एक प्रचारकी चित्रपट आहे. काश्मीर फाईल्स ही प्रपोगंडा फिल्म आहे”.
या वक्तव्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकारांसह चाहत्यांनीही या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटावर केलेल्या टिकेनंतर नादाव हे सोशल मिडीयावर ट्रोल होत आहेत.