रितेश देशमुख प्रेक्षकांना “वेड” लावणार ?
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। रितेश देशमुख त्याच्या आगामी मराठी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने स्वता: केले असून त्याची पत्नि अभिनेत्री जेनिलिया देशमुख या चित्रपटात दिसणार आहे. रितेश देशमुख आणि जेनिलिया १० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे चाहते हा चित्रपट पहायला उत्सुक आहेत. रितेश आणि जेनिलिया यांचा ‘वेड’ हा चित्रपट ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचं टिझर रिलिज झालं. त्यानंतर रितेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘वेड’चा टीझर शेअर केला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर रितेश देशमुखने त्याच्या ‘वेड’ चित्रपटाविषयी माहिती दिली होती. त्याच बरोबर त्यांने चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर करत काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. चित्रपटात जेनेलिया देशमुख एका साध्या लूकमध्ये दिसत आहे. चित्रपटाच्या टिझरला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
रितेशचा ‘वेड’ हा चित्रपट ‘मंजिली’ या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. या मूळ चित्रपटात नागा चैतन्य आणि सामांथा प्रभु हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. मराठीमध्ये रिमेक केलेला हा चित्रपट नावाप्रमाणेच प्रेक्षकांना खरंच वेड लावणार का? असा प्रश्न निर्माण हातो.