पालघरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
by
sahyadrilive
November 23, 2022 5:52 PM
पालघर। सह्याद्री लाइव्ह। मध्ये आज पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. डहाणू, कासा, आंबोली, धानिवरी, उर्से, धुंदलवाडी, घोलवड, तलासरी बोर्डी या परिसरात 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्के जाणवले असुन यापूर्वीही पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.
पालघर जिल्ह्याच्या डहाणू तलासरी भागात मागील तीन वर्षांपासून लहान मोठ्या प्रमाणावर भूकंपाचे हादऱे सुरूच आहेत. हे हादरे मागील सात महिन्यांपासून बंद झाले होते. मात्र आज पुन्हा एकदा भूकंप जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सुदैवानं आजपर्यंत या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे मोठी जीवित हानी झाली नाही. तरी सतत बसणाऱ्या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.