न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड बनले देशाचे ५० वे सरन्यायाधीश
नवी दिल्ली । सह्याद्री लाइव्ह । न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असणार आहेत.
मावळते सरन्यायाधीश उदय लळीत हे ७ नोव्हेंबरला निवृत्त झाले, त्यांना निरोप देण्यात आला. महाराष्ट्राचे सलग दोन न्यायाधीश सर्वोच्च पदावर बसल्यामूळे ही महाराष्ट्रासाठी बर्वाची बाब आहे.
अनेक ऐतिहासिक निकाल दिलेल्या अनेक घटनापीठांचा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा ते भाग राहिलेत. अयोध्या, IPC च्या कलम ३७७ अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणे, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे, शबरीमाला प्रकरण, भारतीय नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अधिकार देणे आदी निर्णयांमध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे.
न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले आहे. १९९८ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळाले होते.