“ट्विटर तेरे टुकडे होंगे” इलॉन मस्क यांनी केले ट्विट?
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । ट्वीटरचे नवे मालक इलॉन मस्क यांच्या नावाने असलेल्या ट्वीटर अकाउंटवरून हिंदीत ट्वीट केल्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे. मस्क यांनी ‘ट्वीटर तेरे तुकडे होंगे’ असं हिंदीत लिहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर आता मस्क यांनी केलेल्या हिंदी ट्वीटवरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
“ट्विटर तेरे टुकड़े होंगे” गैंग को भी $8 देने पड़ेंगे। अशा आशयाचं ट्वीट मस्क यांचं म्हणजे खऱ्या मालकाचं नसुन दूसऱ्याच कोणत्यातरी फेक युजरचं आहे. हा डुप्लिकेट मस्क आहे. सध्या हे ट्वीट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या ट्वीटवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हिंदीमध्ये ट्वीट केलेले मस्क हे Twitter Complaint Hotline Operator आहेत. असं त्यांनी आपल्या अकाऊंटवर मेन्शन केलं आहे. तर कित्येक लोकं ट्वीटरचा मालक असलेल्या इलॉन मस्कचं ट्वीट असल्याचं सांगून फसले आहेत.