साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले
by
sahyadrilive
October 19, 2022 5:21 PM
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । १९ ऑक्टोबर २०२२ हा दिवस राष्ट्रीय स्तरावर प्लास्टिक कचरा संकलन दिन म्हणून आयोजित करण्यात आला होता.याच गोष्टीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांनी महाविद्यालयीन परीसर, राष्ट्रीय स्मारक,खेड पोलिस स्टेशन या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली.गावभर प्रभात फेरी काढून कच-याचे संकलन केले. व स्वच्छतेचा संदेश राजगुरूनगर रहिवाशांना दिला.
या मोहीमेच्या माध्यमातून स्वंयसेवकांनी ९३ किलो कचरा संकलित केला.
यावेळी साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एच.एम.जरे सर, कार्यक्रम अधिकारी प्रा.जी.जी.आहेरकर, प्रा. एस. एल. बुरुड, प्रा. एस. डी. कदम, प्रा. पी. एन. गदादे, प्रा. ए. एच. इनामदार, प्रा. एल. बी. काठे उपस्थित होते.