संजय राऊतांचा दसरा मेळावा तुरूंगातच
by
sahyadrilive
October 4, 2022 3:44 PM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून त्यांच्या जामीन अर्जावर १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
त्यामूळे संजय राऊत यांचा यंदाचा दसरा मेळावा तुरूंगातच होणार हे निश्चित झाले आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ‘ईडी’ने अटक केली होती. यासाठी राऊतांनी पी. एम. ए. न्यायालयात अर्ज केला असून आज त्यावर सुनावणी झाली. दरम्यान ईडीने कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी केल्यामूळे १० ऑक्टोवरपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.