‘CBI’ ही झाली सोशल
Twitter आणि Instagram वर उघडले खाते
नवी दिल्ली । सह्याद्री लाइव्ह । ‘डिजिटल इंडिया’च्या या आधुनिक जगातही भारताची ‘CBI’ म्हणजेच ‘केंद्रीय अन्वेशन विभाग’ सोशल मिडियापासून आजपर्यंत दूर राहीला होता. परंतू १८ ऑक्टोबरपासून सुरू होणा-या इंटरपोलच्या आमसभेच्या पार्श्वभुमीवर ‘CBI’ ने सोशल मिडियावर येण्याचे ठरवले आहे.
प्रसिद्धीपत्रके जारी करण्यासाठी पारंपारिक पद्धत वापरत असलेल्या ‘CBI’ ने Instagram वर cbi_info तर Twitter वर CBI_CIO या नावांनी खाती उघडली आहेत.
आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना अर्थात इंटरपोलचा भारत १९४९ पासून सदस्य आहे. या संघटनेची ९१ वी आमसभा १८ ते २१ ऑक्टोवर हे तिन दिवस नवी दिल्ली येथे होणार आहे. या आमसभेत सायबर क्राईम तसेच लैंगिक अत्याचारासंबधी साहीत्याचा इंटरनेटवर होणारा प्रसार यांसारख्या मुद्द्यांवर भर असणार आहे. या पार्श्वभुमिवर ‘CBI’ ने सोशल होण्याचा निर्णय घेतला आहे.