‘Sova Trojan Virus’ या मोबाइल बँकिंग व्हायरसची भारतामध्ये दहशत
मोबाइल बँकींग ग्राहकांसाठी धोक्याची सुचना
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । ‘इंडियन कंप्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टिम (CERT-In)’ ने सर्व मोबाइल बँकिंग ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. Sova Trojan Virus हा व्हायरस मोबाइल मधील ‘बँकिंग ॲप्स’ना हॅक करुन बँक खात्याची सर्व महत्वाची माहीती, जसे की युजरनेम आणि पासवर्ड चोरुन तुमचे खाते रिकामे करु शकतो.
तरी ग्राहकांनी कोणतीही अनोळखी लिंक ओपन करु नये आणि आपल्या बँकिंग ॲपचा पासवर्ड सतत बदलत रहावे, असा सल्ला ‘CERT-In’ दिला आहे.
हा व्हायरस अनोळखी वेबसाईट किंवा ॲपच्या माध्यमातूनही मोबाइलमध्ये प्रवेश करु शकतो. Google Crome, Amazone, यांसारख्या ॲपचे फेक लोगो बनवून हा व्हायरस मोबाइलमध्ये इंस्टॉल केला जातो. युजरने अनइंस्टॉल करण्याचा प्रयत्न केल्यास ‘This App is Secured’ असा मेसज येतो. हे ॲप पुन्हा अनइंस्टॉल होत नाही अशी माहीती ‘CERT-In’ ने दिली आहे.
‘CERT-In’ च्या माहितीनुसार सप्टेंबर २०२१ मध्ये आलेल्या हा व्हायरस जुलै २०२२ पासून भारतासह काही देशांच्या अंडरग्राउंड मार्केटमध्ये सक्रीय आहे. सर्व मोबाइल बँकिंग करणा-यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.