आळंदी नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेसाठी आजपासून नागरिकांना हरकती नोंदविता येणार
नागरिकांना १४ मे पर्यंत हरकती नोंदविता येणार : दाखल हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी २३ मे रोजी सुनावणी घेणार
आळंदी : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रभाग रचना तयार करण्यात यावी. याशिवाय नागरिकांच्या सूचना हरकतीसाठी जाहीर करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना हरकती सूचना द्यायच्या आहेत. त्यांनी १० ते १४ मे दरम्यान कालावधीत विहित वेळेत आणि मुदतीत हरकती सूचना दाखल करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाने राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आळंदी येथे नगरपरिषदेने नागरिकांच्या सूचना हरकतीसाठी प्रभाग रचना जाहीर केली आहे. १० मार्चला सुरु असलेल्या टप्प्यांपासून निवडणूकांची कार्यवाही त्वरित सुरू करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्याप्रमाणे आळंदीत प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकतीपासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनादेशाने आळंदी नगरपरिषदेने प्रारूप प्रभाग रचना नागरिकांच्या अवलोकनासाठी जाहीर केली आहे.
यामध्ये १० ते १४ मे २०२२ या कालावधीत प्रारूप प्रभागरचनेवर नागरिकांनी हरकती व सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दाखल हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी २३ मे रोजी सुनावणी घेणार आहेत. त्यावर अभिप्राय नोंदवून तो अहवाल ३० मे २०२२ ला विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. संबंधित विभागीय आयुक्त अंतिम प्रभाग रचनेस ६ जूनपर्यंत मान्यता देतील, अशी शक्यता आहे.
आळंदीतील प्रभाग रचना पाहण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाली असून, नागरिकांमध्ये प्रारूप प्रभाग रचना पाहण्याची उत्सुकता रचना जाहीर झाल्याने संपली आहे. आळंदीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहन कुऱ्हाडे, सतीशबापू कुऱ्हाडे, अक्षय रंधवे, सौरभ गव्हाणे, अमित कुऱ्हाडे, प्रसन्न बोराटे, शुभम जाधव, निखिल बनसोडे, संकेत पाटील आदींनी नगरपरिषदेत जाऊन प्रसिद्ध केलेली प्रभाग रचना पाहत समाधान व्यक्त केले आहे. लोकांनी प्रभाग रचना पाहून हरकत सूचना कालावधीत आपल्या हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.