खेड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल
अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणुकीत विशेष चुरस; गुरुवारी माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार
खेड : खेड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि. ६) अखेरच्या दिवशी इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दरवर्षी प्रमाणे यंदाही अध्यक्षपदाकरिता विशेष चुरस निर्माण झाली आहे. अखेरच्या दिवशी अध्यक्ष पदाकरिता चार उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. तरीही अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवपदाची निवडणूक अधिक चुरशीची होईल, अशी वकीलांमध्ये चर्चा आहे.
खेड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ॲड. पांडुरंग राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वकील संघटनेचे सभासद, निवडणूक कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीत अध्यक्षपदाकरिता ॲड. वैभव कर्वे, ॲड. संजय गोपाळे, ॲड. नवनाथ गावडे, ॲड. पांडुरंग राऊत अशा चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
उपाध्यक्षपदाकरिता ॲड. ललीत नवले, ॲड. अमोल घुमटकर, ॲड. विभीषण पडवळ, ॲड. संतोष दाते असे चार अर्ज आहेत. सचिवपदाकरिता ॲड. गोपाळ शिंदे, ॲड. अभिजित जाधव, महिला राखिवपदासाठी अधिक चुरस दिसते. महिला सचिव पदासाठी ॲड. रेश्मा भोर-बागल, ॲड. गायत्री रोकडे, ॲड. अर्चना गायकवाड, ॲड. आरती लोणकर-टाकळकर यांनी उमेदवारी दाखल केले आहेत.
खेड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनची निवडणूक सन २०२२-२३ वर्षांकरित असून, या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष (दोन पद), सचिव (दोन सचिव पैकी एक महिला) खजिनदार, लोकल ऑडिटर आणि सदस्य (चार पद).
गुरुवारी (दि. ७) सकाळी १० ते ११ च्या दरम्यान उमेदवारी अर्जांची छाननी आणि पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत माघारीची वेळ आहे. सायंकाळी ४.३० ते ६.०० वाजेपर्यंत उमेदवारांची मनोगत होतील. मंगळवारी (दि. १२ एप्रिल) सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत मतदान होईल. मंगळवारी सायंकाळी मतमोजणी केली जाईल. बुधवारी (दि. १३ एप्रिल) सायंकाळी ५.०० वाजाता विजयी पदाधिका-यांचा पदग्रहण सोहळा संपन्न होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय कमिटी सदस्य ॲड. दिलीप करंडे यांनी ‘सह्याद्री लाइव्ह’शी बोलताना दिली.
याशिवाय निवडणूक निर्णय कमिटी म्हणून ॲड. बाळासाहेब सांडभोर, ॲड. अरुण मुळूक, ॲड. राजेश कुलकर्णी, ॲड. हर्षा पांडे-कपुसकरी, ॲड. कृष्णा भोगाडे, ॲड. स्वरुपा कोतवाल-वाडेकर हे काम पाहत आहेत.
खेड बार असोसिएशन
निवडणूक कार्यक्रम सन 2022-23
अध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेले उमेदवार
१) ॲड. वैभव बंडोपंत कर्वे
२) ॲड. संजय रामदास गोपाळे
३) ॲड. नवनाथ किसन गावडे
४) ॲड. पांडुरंग पोपटराव राऊत
उपाध्यक्ष पदासाठी आलेले अर्ज
१) ॲड. ललित गणेश नवले
२) ॲड. अमोल दिपक घुमटकर
३) ॲड. बिभीषण रामदास पडवळ
४) ॲड. संतोष बबनराव दाते
सचिवपदाचे दाखल अर्ज
१) ॲड. गोपाळ अशोक शिंदे
२) ॲड. अभिजित अर्जुन जाधव
(महिला राखीव)
१) ॲड. रेश्मा दशरथ भोर-बागल
२) ॲड. गायत्री धोंडीभाऊ रोकडे
३) ॲड. अर्चना मंदार गायकवाड
४) ॲड. आरती अशोक लोणकर-टाकळकर
खजिनदार पदासाठी दाखल अर्ज
१) ॲड. प्रवीण यशवंत पडवळ
२) ॲड. मोहिनी श्रीरंग केदारी
३) ॲड. अशोक बाबुराव कड
लोकल ऑडिटर पदासाठी दाखल अर्ज
१) ॲड. संदीप तुकाराम दरेकर
२) ॲड. अशोक बाबुराव कड
सदस्य पदासाठी दाखल अर्ज
१) ॲड. अबुबकर जमादार पठाण
२) ॲड. निलेश बाळासाहेब देशमुख
३) ॲड. रश्मी रमेश वाघुले
४) ॲड. प्रतिभा ज्ञानेश्वर होले
५) ॲड. अशोक बाबुराव कड