कोथुरणे येथे टोमॅटो पीक प्रशिक्षणास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मावळ : मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेच्या अंतर्गत सन 2021-22 यावर्षीच्या रब्बी हंगामातील टोमॅटो पिकाच्या उत्पादन वाढीसाठी पवनमावळातील कोथुर्णे या गावात टोमॅटो पीक प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रय शेटे, काळे कॉलनीचे कृषी पर्यवेक्षक विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
टोमॅटो प्रशिक्षणांतर्गत टोमॅटो रोपे तयार करण्यापासून किड रोग नियंत्रण, काढणी, काढणी पश्चात तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन तसेच चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी आवश्यक असणारी टोमॅटो पिकांची प्रतवारी, टोमॅटो पिकांचे गुणवत्ता पूर्ण अधिक उत्पादन घ्याचे असेल तर ठिबक सिंचन वापर, प्लास्टिक पेपर (मलचिंग) चा वापर, कामगंध सापळे, जीवामृत, दशपर्णी अर्क वापर या विषयी मार्गदर्शन भरत टेमकर, शास्त्रज्ञ यांनी केले.
कोथुर्णे गावातील भैरवनाथ मंदिरमध्ये टोमॅटो पीक प्रशिक्षणास कृषी पर्यवेक्षक विकास गोसावी, राहुल घोगरे, कृषीसहाय्यक दत्तात्रय गावडे, सुनील गायकवाड, शीतल गिरी, अश्विनी खंडागळे, प्रमिला भोसले उपस्थित होते.
तसेच श्रीहरी शेतकरी गटाचे नामदेव दळवी , छबन दळवी, कृषीमित्र लहू दळवी, संदीप दळवी, दत्तोबा महाराज, दत्तू नढे, विजय दळवी, अक्षय दळवी, मारुती काकडे, बाळासाहेब दळवी, श्रीधर दळवी, मारुती दळवी, तुकाराम दळवी, अंकुश ढोले, किसन दळवी, भाऊ दळवी, सुनील पठारे, दत्ता लोयरे, बळीराम दळवी, नथू फाटक, सोपान मसूरकर, रामचंद्र ठाकर, रामू दळवी कडधे येथील प्रगतशील शेतकरी नितीन तुपे, खंडू तुपे, उर्से येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर धामणकर हे शेतकरी प्रशिक्षणास उपस्थित होते.
कोथुरणे येथे रब्बी हंगाम टोमॅटो पीक शेतीशाळा हा उपक्रम राबविण्यात आला आहे. टोमॅटो पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार टप्प्या-टप्प्याने वर्ग घेण्यात आले आले. टोमॅटो प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन दत्तात्रय गावडे, कृषी सहायक नामदेव दळवी, अध्यक्ष श्रीहरी शेतकरी गट यांनी केले.
शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच पिके घ्यावीत, टोमॅटो पिकामध्ये सेंद्रीय घटकाचा वापर करणे सर्वात महत्वाचे, खते देण्याच्या वेळा साधणे आवश्यक, बियाणे संस्कार काळाची गरज, सेंद्रीय खते देणे आवश्यक, पिकाची प्रतिकारशक्ती वाढवणे गरजचे, कीटकनाशकाची फवारणी दोन टप्प्यात एक सूर्यादयापूर्वी आणि संध्याकाळी करणे, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून टोमॅटो पीक उत्पादन वाढविणे
– भरत टेमकर, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव.