जागतिक महिला दिनानिमित्त नाणोलीमध्ये किसान गोष्टी कार्यक्रम
मावळ : नानोलीतर्फे चाकण येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी मावळतर्फे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०२१-२२ अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त किसान गोष्टी कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
त्यावेळी वडगाव कृषी पर्यवेक्षक नवीनचंद्र बो-हाडे यांनी महिला सशक्तिकरण, झिरो शून्य मशागत यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. मंडळ कृषी अधिकारी आर. पी. गायकवाड, राहुल घोगरे बीटीएम आत्मा पीक विमा प्रतिनिधी सागर ढवले, ग्रामसेवक सचिन लिंबरकर, सरपंच मोनिका शिंदे, उपसरपंच अनिता बोराडे, अनिता गायकवाड, सुमन लोंढे, शारदा मराठे, मनीषा बो-हाडे, आरती टपाले, रेश्मा शिंदे, पल्लवी मालपोटे व शेतकरी महिला उपस्थित होते.
तसेच अल्पोपहार देण्यात आला. सूत्रसंचालन पी. एस. पाटील यांनी केले.
महिला सक्षमीकरण व महिला आर्थिक सबलीकरण होणे गरजेचे आहे, त्यासाठी महिलांना कृषी विभागाच्या विविध योजनाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येत आहे.
– प्रियंका पाटील, कृषी सहाय्यक, नानोली