मासळीच्या भावात वाढ
मार्गशीर्ष महिना संपल्याने मागणीत वाढ मटण, चिकन आणि अंडी स्थिर
पुणे : मार्गशीर्ष महिना संपल्याने मासळीला मागणी आहे. त्यामुळे काही प्रकारच्या मासळीच्या भावात किंचितशी वाढ झाली आहे. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटण, चिकन आणि अंडीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (दि. 9) खोल समुद्रातील मासळीची सुमारे 25 टन, खाडीच्या मासळीची 300 किलो, नदीतील मासळी 1 टन तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे 18 टन आवक झाली. किनारपट्टी लगत पाऊस झाल्याने आणि वादळाचा अंदाज असल्याने कोकण किनारपट्टीवरून आवक कमी झाली होती. तर, मार्गशीर्ष महिना संपल्याने मासळीची मागणी टिकुन असल्याने भावात वाढ झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)
पापलेट : कापरी : 1400-1600, मोठे- 1400 मध्यम : 1000-1200, लहान 800-900, भिला : 500-700, हलवा : 500-600, सुरमई : 440-600, रावस : लहान 800-900, मोठा : 900-1000, घोळ : 600-700, करली : 200-280, पाला : 700-1400, वाम : 360-800, करंदी-100-160, सोललेली 400-480 ओले बोंबील : 160-200, भिंग-360.
कोळंबी : लहान 180-360, मोठी-440-600, जंबोप्रॉन्स : 1500 किंगप्रॉन्स : 750-900, लॉबस्टर : 1500-1700, मोरी : 200-280, खेकडे : 300-400. चिंबोऱ्या : 480-550, मांदेली-100-160, राणीमासा-160-200.
खाडीची मासळी : सौंदाळे-200-280, खापी-160-240 नगली : 320-600, तांबोशी : 320-480, पालू- 400, बांगडा : लहान-100-140, बांगडा मोठा-160-240, शेवटे 200, तिसऱ्या-200 240, खुबे : 120-160, लेपा-120-200, पेडवी-100, वेळुंजी-160-200 तारली-180-200.
नदीतील मासळी : रहू-160-180, कतला-140-180, मरळ-400-550, शिवडा-200-280, खवली- 160-240, आम्ळी- 80-160, खेकडे- 200-280, वाम-500-55
मटण : बोकडाचे : 680, बोल्हाईचे : 680, खिमा 680, कलेजी : 700.
चिकन : 200, लेगपीस : 250, जिवंत कोंबडी : 150, बोनलेस : 300
अंडी : गावरान : शेकडा – 910, डझन 120, प्रती नग 10, इंग्लिश : शेकडा -505, डझन 72, प्रति नग 6.