15 दिवसात 80 क्रीडा शिक्षकांची भरती करणार – क्रीडा मंत्री गिरीष महाजन
by
sahyadrilive
August 24, 2022 2:13 PM
मुंबई : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील खेळाडू यश संपादन करीत आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 80 प्रशिक्षक यांची येत्या 15 दिवसांत नेमणूक करण्यात येईल. प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल उभारणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.
पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न करु. 124 तालुक्यात व्यायामशाळा सुरू करुन छोट्या गावात व्यायामशाळांना उत्तम दर्जाचे साहित्य पुरविले जाणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी यावेळी दिली.
ग्रामविकास विभागासंदर्भातील शाळा – महाविद्यालय देखभाल दुरुस्तीसंदर्भात तातडीने निर्णय घेण्यात येईल. पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या देयकांचा प्रश्न सोडविण्यात येईल, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.