ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी 70 टक्के मतदान
जिल्ह्यातील 41 ग्रामपंचायतीमधील 53 जागांसाठी झाले मतदान
पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. जिल्ह्यातील 41 ग्रामपंचायतीमधील 53 जागांसाठी सायंकाळी साडेपाचपर्यंत 70 टक्के एवढे मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सर्वाधिक मतदान भोर तालुक्यातील दोन ग्रामंपाचयतींच्या दोन जागांवर 90.89 टक्के एवढे झाले आहे.
इंदापूरमध्ये झालेल्या एका जागेसाठी 87.67 टक्के मतदान झाले आहे. 29 हजार 407 मतदारांपैकी 20 हजार 339 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 9 हजार 68 जणांनी मतदान करण्याकडे पाठ फिरवली. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या 503 जागांवर पोटनिवडणूक होणार होती. परंतु, त्यापैकी अनेक जागांवर उमेदवारी अर्जच आले नाही तर काही जागांवरील अर्ज बाद झाले. तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्याने केवळ 53 जागांसाठीच मंगळवारी मतदान झाले असल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
तालुका – ग्रामपंचायत – जागा – मतदानाची टक्केवारी
- वेल्हे – 2 – 2 – 81.82
- भोर – 2 – 2 – 90.89
- पुरंदर – 4 – 9 – 80.79
- दौंड – 1 – 1 – 66.44
- इंदापूर – 1 – 1 – 87.67
- बारामती – 2 – 2 – 78.55
- जुन्नर – 7 – 10 – 61.48
- आंबेगाव – 2 – 2 – 53.78
- खेड – 5 – 5 – 77.50
- शिरूर – 2 – 3 – 84.80
- मावळ – 3 – 3 – 54.87
- मुळशी – 9 – 12 – 64.10
- हवेली – 1 – 1 – 68.49