महावितरणच्या वीजग्राहकांकडे २०४ कोटींची थकबाकी; थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
पुणे । सह्याद्री लाइव्ह । पुणे परिमंडलातील ७ लाख ८ हजार ८९२ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे २०४ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा केला नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरु आहे. यामध्ये गेल्या पंधरवड्यात पुणे परिमंडलातील १४ हजार १५५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पुणे शहरात ७६ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी
सद्यस्थितीत पुणे शहरात एकूण ३ लाख १४ हजार ९२० वीजग्राहकांकडे ७६ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख ६८ हजार १२२ ग्राहकांकडे ५३ कोटी ९१ लाख रुपये, वाणिज्यिक ४३ हजार ६३८ ग्राहकांकडे २० कोटी ९ लाख रुपये आणि औद्योगिक ३ हजार १६० ग्राहकांकडे २ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे ८ हजार ९१४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात ५४ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी
पिंपरी चिंचवड शहरात एकूण १ लाख ५१ हजार ४०९ वीजग्राहकांकडे ५४ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख २५ हजार ८६९ ग्राहकांकडे ३१ कोटी ६३ लाख रुपये, वाणिज्यिक २१ हजार ३५ ग्राहकांकडे १३ कोटी ४ लाख रुपये आणि औद्योगिक ४ हजार ५०५ ग्राहकांकडे ९ कोटी ६१ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ९५२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ७४ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी
ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण २ लाख ४२ हजार ५६३ वीजग्राहकांकडे ७४ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख १६ हजार २६१ ग्राहकांकडे ५२ कोटी ५७ लाख रुपये, वाणिज्यिक २२ हजार ५९६ ग्राहकांकडे १४ कोटी ३५ लाख रुपये आणि औद्योगिक ३ हजार ७०६ ग्राहकांकडे ७ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ४ हजार २८९ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९) व रविवारी (दि. ३०) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे ‘ऑनलाईन’सोय उपलब्ध आहे.
वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES