राजगुरुनगर शहरात महात्मा फुलेंचा १३३ वा स्मृतिदिन साजरा
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने विशेष सन्मान
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । महात्मा जोतिबा फुले यांच्या १३३ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी महात्मा फुले समाजविकास प्रतिष्ठाण राजगुरूनगर यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले समाजविकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शांताराम घुमटकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून महात्मा फुले यांच्याबद्दलचे आपले विचार मांडले. त्याचबरोबर गटविकास अधिकारी विशाल शिंदे, प्रसिद्ध वक्ते कैलास मुसळे, विनायक घुमटकर, कैलास घुमटकर, सारिका घुमटकर आणि कमल कळमकर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष गणेश घुमटकर, निलेश पांढरकर, बाबाजी गायकवाड, सोपान घुमटकर, धीरज घुमटकर, प्रभाकर माळी, सुनील घुमटकर आदि मान्यवर उपस्थित होते.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES