खरपुडी खुर्द खंडोबा मंदिर परिसरातील मोरांसाठी शिरवी बंधूंकडून १०० किलो धान्य
खेड : खरपुडी खुर्द येथील श्री खंडोबा मंदिर परिसरात मोरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. मात्र उन्हाळ्यात या मोरांसाठी चारा-पाणी व्यवस्था करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. मात्र तरीही राजगुरुनगर परिसरातील एका व्यावसायिकाने मोरांसाठी शंभर किलो धान्य दिल्याने मोरांसाठी पुढील काही दिवस धान्यचा प्रश्न सुटला आहे.
राजगुरूनगर येथील जय आंबे सुपर मार्केटचे मालक शिरवी बंधू यांनी १०० किलो धान्य दिले.
यावेळी खरपुडी खुर्द गावचे माजी सरपंच, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवक्ते उमेश गाडे, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष महेंद्र काळे, खेड तालुका राष्ट्रवादी युवक सरचिटणीस विशाल भगत तसेच मोरांसाठी रोज धान्य टाकण्याची व्यवस्था करतात ते खंडोबा देवस्थानचे पुजारी राजेश गाडे हे उपस्थित होते.
शिरवी बंधूंच्या या दानशूरपणाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तसेच त्यांनी खाद्य दिल्याबद्दल खरपुडी ग्रामस्थांतर्फे आभार मानले.