मसाला चहा: पावसाळ्यात हवाच सुगंधी, आरोग्यवर्धक मसाला चहा! ‘चहा मसाल्याची’ ही कडक रेसिपी
एका मुलाखतीत मुनमुनने मालिका सोडण्याविषयी वक्तव्य केलं आहे.
चहा हा बहुसंख्य भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. दिवसाची सुरूवात तर चहा घेतल्याशिवाय होतच नाही. म्हणूनच तर सकाळचा चहा मस्त रिफ्रेशिंगच हवा. कधीकधी सकाळची खूप गडबड असली, की चहामध्ये अद्रक किसून टाकायचा भारी कंटाळा येतो. मग बऱ्याचदा तसाच चहा प्यावा लागतो. त्या चहाने काही समाधान होत नाही. म्हणूनच तर हा सुगंधित आणि आरोग्यवर्धक चहा मसाला तुमच्या घरी तयार करून ठेवा. एकदा हा मसाला करून ठेवला की अगदी महिनाभर व्यवस्थित टिकतो.
चहा मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य
अद्रक किंवा सुंठ, विलायची, लवंग, दालचिनी, जायफळ, मीरे.
कसा करायचा चहा मसाला
१. चहा मसाल्यासाठी अद्रक किंवा सुंठ यापैकी काहीही वापरले तरी चालते. जर अद्रक वापरणार असाल तर ते किसून घ्या आणि कढईमध्ये टाकून चांगले भाजून घ्या. अद्रकामध्ये ओलसरपणा राहिलेला नसेल, याची काळजी घ्यावी, अन्यथा मसाला खराब होऊ शकतो. जर सुंठ पावडर वापरणार असाल तर ती केलेल्या मसाल्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकावी.
२. आता अद्रक एकदा किसून भाजून झाले की मग त्या कढईत विलायची, मीरे, लवंग टाकावी. विलायची आणि लवंग यांचे प्रमाण सारखे ठेवावे. तसेच त्यांच्या एक चतुर्थांश प्रमाणात मीरे घ्यावेत. हे तिन्ही व्यवस्थित भाजून घ्यावे.