“Porn Vs Prostitution वर बोलूयात, कॅमेरासमोरच्या सेक्ससाठी…”; राज कुंद्रांचे ९ वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल
अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपांखाली व्यवसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री उशीरा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.
नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी
व्हायरल झालेलं ट्विट हे राज कुंद्रा यांनी २०१२ साली केल्याचं स्क्रीनशॉर्टमधून दिसून येत आहे. २९ मार्च २०१२ रोजी ब्लॅकबेरी फोनवरुन करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये राज यांनी पॉर्न विरुद्ध देहविक्री म्हणजेच प्रॉस्टीट्यूशनबद्दल दोन प्रश्न उपस्थित केले होते. “पॉर्न विरुद्ध प्रॉस्टीट्यूशनवर बोलूयात. कॅमेरासमोरच्या सेक्ससाठी (कॅमेराच्या माध्यमातून शूट केलेल्या पॉर्न फिल्मसाठी) पैसे देण्याला कायदेशीर मान्यता का देण्यात आलीय? हे दुसऱ्यापासून (प्रॉस्टीट्यूशनपासून) वेगळं कसं ठरतं?”, असा उल्लेख या ट्विटमध्ये आहे.