इशान किशनची गर्लफ्रेंड आहे ‘सुपरहॉट’, ठरली होती ‘मिस इंडिया’ फायनलिस्ट
इशान किशनच्या गर्लफ्रेंडचं नाव आदिती हुंडिया आहे. ती पेशाने मॉडेल आहे. अदिती सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. ती इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर करत असते.
by
Sahyadrilive
July 20, 2021 1:04 PM
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हटलं की त्यांच्या वैयक्तिक जीवनावरही सर्वांचं लक्ष असतं. भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या जोडीदारांबाबतही लोक चर्चा करतात. भारताचा युवा स्फोटक क्रिकेटपटू इशान किशनबाबतही अनेकांना जाणू घेण्यात रस आहे. इशानने काल रविवारी पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या सामन्यात भारतानं श्रीलंकेला ७ गडी राखून पराभूत केलं. या विजयात इशानची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्यानं ४२ चेंडूत ५९ धावा केल्या. इशाननं पदार्पणात अर्धशतक झळकावून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या. अशात त्याच्या गर्लफ्रेंडबाबतही चर्चा होऊ लागली. इशानची गर्लफ्रेंड टॉपच्या बॉलिवूड अभिनेत्रीलाही टक्कर देते.
इशान किशनच्या गर्लफ्रेंडचं नाव आदिती हुंडिया आहे. ती पेशाने मॉडेल आहे. अदिती सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. ती इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर करत असते. २०१७मध्ये फेमिना ‘मिस इंडिया’च्या फायनलमध्ये पोहोचल्यावर आदिती सर्वांच्या ओळखीची झाली. यानंतर तिनं २०१८मध्ये ‘मिस सुपरानॅशनल इंडिया’ अवॉर्डही पटकावला. या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केलेला नाही.